शरद पवारांच्या परवानगीशिवाय उद्धव ठाकरे… : केसरकरांचा मोठा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sharad Pawar – Uddhav Thackeray News :

ADVERTISEMENT

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परवानगीशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कुणालाही प्रवेश दिला जात नाही, असा मोठा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे मंत्री आणि कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. जिल्हा वार्षिक योजनांच्या आढावा बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला, यावेळी त्यांनी हा आरोप केला.

दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कुणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा याबद्दलचा निर्णय शरद पवार यांना विचारल्याशिवाय होत नाही. मात्र, शिवसेनेचे वाघ कुणाच्याही दबावात रहात नाहीत. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, हे लक्षात आल्यानंतर कट्टर शिवसैनिक राष्ट्रवादीविरोधात पेटून उठेल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

हे वाचलं का?

काय म्हणाले दीपक केसरकर?

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे साथ सोडून नैसर्गिक मित्र असणार्‍या भाजपबरोबर युती करावी, अशी आमदारांची इच्छा होती. तसा निर्णय झाला असता, तर मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच राहिले असते. पण उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार गेले. शिवसेनेचा वाघ कधीच कुणाच्याही दबावाखाली रहात नाहीत. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारल्याशिवाय घेतला जात नाही.

राष्ट्रवादीच्या वातीनं संजय राऊत शिवसेना संपवत आहेत, हे कट्टर शिवसैनिकांच्या लक्षात येईल, तेव्हा ते राष्ट्रवादीविरोधात पेटून उठतील, असंही ते म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना उजाडण्यापूर्वी कोसळेल, असं खासदार संजय राऊत यांनी भाकित केलंय. संजय राऊतांच्या वक्तव्याचाही केसरकर यांनी समाचार घेतला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT