धक्कादायक ! शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या
मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून नेहरु नगर पोलीसस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रजनी कुडाळकर यांनी रात्री 9 वाजल्याच्या दरम्यान आत्महत्या केल्याचं […]
ADVERTISEMENT

मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून नेहरु नगर पोलीसस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रजनी कुडाळकर यांनी रात्री 9 वाजल्याच्या दरम्यान आत्महत्या केल्याचं कळतंय. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेहरु नगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितंल की, ‘सध्या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.’










