आमदार संजय शिरसाट अजूनही आयसीयुमध्येच; तब्येतीबाबत काय म्हणाले डॉक्टर?
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अर्थात शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असून सध्या त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिली. आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना आज एअर अँब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईला आणण्यात […]
ADVERTISEMENT

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अर्थात शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असून सध्या त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिली.
आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना आज एअर अँब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईला आणण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. सोमवारी दुपारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे.
संजय शिसराट यांच्यावर अँजिओप्लास्टी :
दरम्यान, डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला आणल्यानंतर शिरसाट यांच्या काही बेसिक टेस्ट करण्यात आल्या. त्यांची अॅंजिओग्राफीही करण्यात आली. यात एक ब्लॉक निघाला. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे आता साधारण 5 दिवस त्यांना रुग्णालयात थांबावं लागणार आहे.
खबरदारी म्हणून सध्या शिरसाट यांना आयसीयूमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयात अॅडमिट केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन केला होता. त्यांनी शिरसाट यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि भेटायला येतो असं सांगितलं आहे. आता नेमकं कधी ते वेळ कळवतील, असंही डॉक्टर पारकर म्हणाले.









