Sanjay Raut: “गजानन किर्तीकर यांना पक्षाने काय दिलं नाही? उद्या त्यांना लोक विसरतील”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटासठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी गजानन किर्तीकरांविषयी?

गजानन किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. पक्षानं त्यांना काय दिलं नाही. ते पाच वेळा आमदार राहिले आहेत, तर दोन वेळा पक्षाकडून त्यांना खासदारकी मिळाली. दोन वेळा त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होता असे राऊत यावेळी म्हणाले. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर के कडवट शिवसैनिक आहेत, ते पक्षाबरोबरच असल्याचे राऊत म्हणाले. गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते ज्यावेळी सर्व काही भोगून पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते असे राऊत म्हणाले.

गजानन किर्तीकर गेल्याने काही फरक पडणार नाही

गजनान किर्तीकर पक्ष सोडून गेले फार काही सळसळ झाली असा भाग नाही. उद्यापासून लोक त्यांना विसरुन जातील असेही राऊत म्हणाले. किर्तीकर गेल्याचा पक्षाला कोणताही धक्का नाही. 13 खासदार आत्तापर्यंत शिंदे गटात दाखल झाले आहेत, यावर बोलताना राऊत म्हणाले की ते पुन्हा निवडून येतात का ते बघू. एकनाथ शिंदे यांची दिशी बरोबर आहे की चूक आहे याचा फैसला जनता करेल असेही राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले आहेत संजय राऊत?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आमच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव गेलं, तरीही आमचा मोठ्या फरकानं विजय झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. या निवडणुकीत जनतेनं आम्हाला ६८ हजार मतं जनतेने दिली आहेत. खासदार गजाजन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, पक्षावर त्यांच्या जाण्याचा काही परिणाम होणार नसल्याचे राऊत म्हणाले. ते जरी तिकडे गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर हे आमच्यासोबत आहेत आणि राहतील. अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत असंही राऊत म्हणाले. मला तुरुंगात टाकले तरीसुद्धा मी पार्टीसोबत आहे. संकटात पार्टीबरोबर जे असतात त्यालाच निष्ठा म्हणतात असेही राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT