उद्धव ठाकरे आपल्या माणसालाही सोडणार नाहीत- संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उद्धव ठाकरे हे आपल्या माणसालाही सोडणार नाहीत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राठोड यांनी जे शक्तीप्रदर्शन पोहरादेवी या ठिकाणी केलं त्या विषयावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. कायदा आणि सुवव्यवस्था याबाबत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार हे गंभीर आहे. वेळ आली तर मुख्यमंत्री कुणी आपला माणूस असला तरीही त्याला सोडणार नाहीत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का ? हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातो आहे. शरद पवार यांनी संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली का? असा प्रश्न विचारला असता त्याबाबत आपल्याला काही ठाऊक नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी या ठिकाणी झालेल्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त करत यासंबंधी कारवाई करण्याचे निर्देश मंगळवारीच दिले आहेत. तसंच वाशिमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवालही मागवण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर गेल्या पंधरा दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे काल पोहरादेवीत गेले होते. तिथे त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं कारण ते जेव्हा पोहरादेवी या ठिकाणी पोहचले तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी तिथे हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. पूजा चव्हाण प्रकरणात मला नाहक बदनाम केलं जातं आहे ती बंजारा समाजाची होती. पूजा चव्हाणचा मृत्यू ही दुर्दैवी घटना होती तिची, माझ्या बंजारा समाजाची आणि माझी बदनामी करणं थांबवा असंही आवाहन त्यांनी मंगळवारी केलं. मात्र जी गर्दी पोहरादेवी या ठिकाणी झाली होती त्यासंबंधी कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हा व्हिडिओ देखील पहा..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT