फडणवीसांसोबत गेलेले अजित पवार आणि सगळे आमदार का परतले? संजय राऊत यांनी दिलं उत्तर

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला पहाटेचा शपथविधी महाराष्ट्र अद्यापही विसरलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच अजित पवारांना शरद पवारांकडे पाठवलं होतं अशी चर्चा तेव्हापासून होते आहेत. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवारांना मुलाखतीत नेमका हाच प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार म्हणाले की मी त्यांना पाठवलं असतं तर अजित पवारांनी अर्धवट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला पहाटेचा शपथविधी महाराष्ट्र अद्यापही विसरलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच अजित पवारांना शरद पवारांकडे पाठवलं होतं अशी चर्चा तेव्हापासून होते आहेत. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवारांना मुलाखतीत नेमका हाच प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार म्हणाले की मी त्यांना पाठवलं असतं तर अजित पवारांनी अर्धवट काम नसतं केलं. आता अजित पवार परत का आले? त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत का आले याचं उत्तर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार

काय म्हणाले संजय राऊत?

हे वाचलं का?

    follow whatsapp