शेलार विरुद्ध किशोरी पेडणेकर वाद : शिवसेनेकडून आशिष शेलारांना नाच्याची उपमा, मुंबईत पोस्टरबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप आमदार आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात सुरु झालेला वाद काहीकेल्या शांत होताना दिसत नाहीये. किशोरी पेडणेकरांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी आशिष शेलारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर शेलारांनी हायकोर्टात धाव घेतली. काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मुंबईत आशिष शेलारांविरुद्ध पोस्टरबाजी करण्यात आली आहे. ज्यात शेलारांना तमाशातील नाच्याच्या रुपात दाखवण्यात आलं आहे.

हा वाद इतका शिगेला पोहचला आहे की शिवसैनिकांनी आशिष शेलारांवर टीका करणारं पोस्टर थेट मुंबईतील नरिमन पॉईंट भागात भाजप कार्यालयाच्या समोर लावलं आहे. ज्यात,

‘कसं काय शेलार बरं हाय का ?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काल काय एैकलं ते खरं हाय का ?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला,

ADVERTISEMENT

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला ? असा मजकूर लिहून टीका केली आहे. आशिष शेलारांचा नाच्याच्या वेशात मॉर्फ केलेला फोटोही यात लावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

काय होतं आशिष शेलारांचं वक्तव्य ज्यामुळे हा वाद सुरु झाला?

आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं होतं.

वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात. पण तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल शेलार यांनी केला.

शेलारांच्या या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ज्यानंतर काही दिवसांनी पेडणेकर यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. ज्यात अश्लिल भाषेचा वापर करत पेडणेकरांच्या परिवाराला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन जुन्या मित्रांमधला वाद पुन्हा उफाळून आल्यामुळे यावर आता दोन्ही पक्षातले नेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT