Chinchwad Election : राहुल कलाटेंना पुन्हा पक्षात घेणार? ठाकरेंचे संकेत
Uddhav Thackeray on rahul Kalete : मुंबई : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly) बंडखोरी करुन निकालात ट्विस्ट आणलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पुन्हा पक्षात घेणार असल्याचे संकेत शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. ते आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत बंडखोरी करु नये असे स्वतः ठाकरे यांनी […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on rahul Kalete :
मुंबई : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly) बंडखोरी करुन निकालात ट्विस्ट आणलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पुन्हा पक्षात घेणार असल्याचे संकेत शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. ते आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत बंडखोरी करु नये असे स्वतः ठाकरे यांनी सांगूनही कलाटे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली होती. मात्र आता ठाकरे यांनीच कलाटे यांना सोबत घेण्याबाबत सुतोवाच केलं आहे. (Chinchwad Assembly Election | Uddhav Thackeray on rahul Kalete)
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कसब्यामध्ये पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद आहे. मतदारसंघातील मतदारांनी प्रभावाबाहेर येऊन वेगळा विचार केला हे कौतुकास्पद आहे. देशही या प्रभावाबाहेर येईल. टिळकांच्या घराण्याबाबत ‘वापरा आणि फेकून द्या’ ही रणनीती अवलंबण्यात आली. बापट यांना आजारी असतानाही प्रचाराला आणलं, या गोष्टी मतदारांना रुचल्या नाहीत.
तर चिंचवडमध्येसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपविरोधीतील मतांची बेरीज वाढत आहे. काटे आणि कलाटे या दोन्ही उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची बेरीज केल्यास मतदार जागृक होत आहेत. आता हे आमच्यावर आहे की एकत्र राहणं आणि मतांची बेरीज करणं. यामुळे भाजपचा पराभव शक्य आहे, असं म्हणतं ठाकरे यांनी कलाटे यांना पक्षात घेण्याबाबत संकेत दिले.