Shivshahi Bus Accident: चालकाच्या 'त्या' एका चुकीमुळं शिवशाही बस झाली पलटी, २ जणांचा मृत्यू, २० प्रवासी जखमी
Shivshahi Bus Accident Latest Update : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावतीच्या नंदगाव पेठ एमआयडीसी जवळ हा अपघात झाला. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाने गायीला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी होऊन मोठा अपघात झाला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात
अपघाताची घटना घडण्यामागचं कारण काय?
या अपघातामुळं वाहतूक काही काळ ठप्प
अमरावती, धनंजय साबले
ADVERTISEMENT
Shivshahi Bus Accident Latest Update : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावतीच्या नंदगाव पेठ एमआयडीसी जवळ हा अपघात झाला. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाने गायीला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून जवळपास २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. बस चालकाने ज्या गायीला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या गायीचाही या अपघातात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या अमरावतीत नांदगांव पेठ परिसरातील रिलायंस पेट्रोल पंपजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वर बसचा अपघात झाला. ही शिवशाही बस रस्त्यावरून जाणाऱ्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात पलटी झाली. या दुर्देवी घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> "पंतप्रधानांनी आधी आमच्या दीदींना सुरक्षा द्यावी, नंतर..."; 'लखपती दीदी' मेळाव्यापूर्वी संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढलं आणि अमरावतीच्या इर्विन सरकारी रुग्णालयात दाखल केलं. उपचाऱ्यादरम्यान २ जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. अपघात घडल्यानंतर नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पलटी झालेल्या बसला दोन क्रेनच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळं महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
हे ही वाचा >> Crime: महाराष्ट्रातील 'हे' शहर बनलंय जुगाऱ्यांचा अड्डा! पोलिसांनी आवळल्या ९ जणांच्या मुसक्या
"प्राथमिक माहितीनुसार, ही शिवशाही बस आहे. ही बस अमरावतील चालली होती. हायवेवर गाय आडवी आल्यानं हा अपघात झाला. सर्व जखमींना इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. सर्व जखमींना चांगल्या सुविधा देण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं कामंही सुरु आहे. एक किंवा दोन गंभीर आहेत,अशी प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक माहिती तपासली जात आहे", असं अमरावतीचे डीसीपी सागर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT