Shraddha Walker Murder : आफताबचा पहाटे 4 वाजताचा CCTV व्हिडीओ, पाठीवर बॅग अन् हातात…
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाविरुद्ध पोलीस सध्या पुराव्यांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात आता आफताब पूनावालाचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ श्रद्धा वालकरची हत्या झाल्यानंतरचा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ पहाटे चार वाजताचा आहे. ज्यात आफताब हातात बॅग घेऊन चालत जाताना दिसत आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण देशभरात […]
ADVERTISEMENT
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाविरुद्ध पोलीस सध्या पुराव्यांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात आता आफताब पूनावालाचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ श्रद्धा वालकरची हत्या झाल्यानंतरचा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडीओ पहाटे चार वाजताचा आहे. ज्यात आफताब हातात बॅग घेऊन चालत जाताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या करत तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते मेहरोलीच्या जंगलात फेकले. पोलीस सध्या श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेत असून, आफताबचा एक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागलाय.
मिळालेल्या माहितीनुसार आफताबचा हा व्हिडीओ 18 ऑक्टोबरच्या रात्रीचा आहे. 21 सेंकदाच्या या व्हिडीओत आफताब पूनावाला घरातून बाहेर पडल्यानंतर चालत जाताना दिसत आहे. आफताबच्या पाठीवर एक बॅग असून, हातात एक बॉक्स आहे.
हे वाचलं का?
Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाला इतकं मारलं की…; या फोटोमागची कहाणी काय?
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आफताब दररोज ते फेकत होता. 18 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजताचा हा व्हिडीओ असून आफताब इतक्या पहाटे कुठे निघाला होता आणि आफताब घेऊन जात असलेल्या पॅकिंग बॉक्समध्ये काय होतं, यावरचा पडदा अजून बाजूला व्हायचाय. मात्र, हा व्हिडीओ आफताब विरोधात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असं सूत्रांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आफताब पूनावालाने पोलिसांना काय सांगितलंय?
आफताब पूनावालानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने 18 मे रोजी श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि 5 जून पर्यंत त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे मेहरोलीच्या जंगलात फेकले. अशात आफताबचा 18 ऑक्टोबरचा पहाटे 4 वाजता घराबाहेर पडतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं त्याने खोटी माहिती दिलीये क? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झालाय.
Shraddha Murder Case : 10 तासांत श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबने बिअर घेतली अन्…
आफताब पूनावालाच्या सीसीटीव्ही व्हिडीओमुळे निर्माण झालेले प्रश्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या चौकशीत आफताबने अनेकवेळा चुकीची माहिती दिलीये. त्यामुळे या व्हिडीओने काही शंका उपस्थित झाल्या आहेत. श्रद्धा हत्या प्रकरण समोर येण्याच्या काही दिवस आधीपर्यंत आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकत होता? कारण आफताब वर्क फ्रॉम होम करत होता. त्यामुळे पहाटे चार वाजता घराबाहेर पडण्याइतकं आफताबला कोणतं काम होतं? असे प्रश्न पोलिसांसमोर उभे आहेत.
#WATCH | Shraddha murder case: CCTV visuals of Aftab carrying bag at a street outside his house surface from October 18 pic.twitter.com/S2JJUippEr
— ANI (@ANI) November 19, 2022
श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने जुना फोन OLX वरून विकला
पोलिसांनी केलेल्या तपासात अशी माहिती समोर आलीये की आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याचा जुना फोन ओएलएक्सवरून विकला होता. पोलिसांपर्यंत कोणतीही माहिती पोहोचू नये म्हणून त्याने फोन विकला होता. त्याचबरोबर श्रद्धा वालकरचा फोन महाराष्ट्रात नेऊन फेकल्याचं त्यानं सांगितलंय. मात्र, हा फोन अद्याप सापडलेला नाही. सध्या पोलीस दोन्ही फोनचा शोध घेताहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT