Shraddha Murder Case : घरभाडे करार ते पाण्याचं बिल… 5 व्यक्तींचे जबाब आफताबला अडकवणार!
Shraddha Walker Murder update news : जिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता, त्याच श्रद्धा वालकरला आफताब अमीन पूनावालाने संपवलं. संपवल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. आफताबने याची चौकशीत कबुली दिलीये, पण हे सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पोलीस आता ठोस पुरावे शोधत आहेत. आफताबने श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि मेहरोलीच्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी […]
ADVERTISEMENT

Shraddha Walker Murder update news : जिच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता, त्याच श्रद्धा वालकरला आफताब अमीन पूनावालाने संपवलं. संपवल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे केले. आफताबने याची चौकशीत कबुली दिलीये, पण हे सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पोलीस आता ठोस पुरावे शोधत आहेत.
आफताबने श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि मेहरोलीच्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. याच जंगलात पोलीस आता श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना आतापर्यंत १३ तुकडे मिळाले आहेत. पण, महत्त्वाचा पुरावा म्हणजे श्रद्धाचं शीर अजूनही पोलिसांना मिळालेलं नाही.
श्रद्धाच्या शिराबरोबर, तिचा मोबाईल फोनही पोलिसांना मिळालेलं नाही. त्याचबरोबर ज्या हत्याराने आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, तो हत्यारही पोलिसांना मिळालेलं नाही. पण, या हत्याकांडातील काही गोष्टी आहेत, ज्या आफताबला दोषी सिद्ध करण्यास महत्त्वाच्या ठरू शकतात.
Shraddha Murder Case : 10 तासांत श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबने बिअर घेतली अन्…
