Sidhu Moose wala Murder Case : संतोष जाधवचं नवं कनेक्शन, माहितीने पुणे पोलिसांची उडवली झोप
सिद्धू मुसेवाला प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या रडारवर आलेल्या संतोष जाधवचे एक-एक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणात केलेल्या तपासातून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असून, त्याच्या टोळीतील सदस्यांची धरपकड पोलिसांकडून केली जात आहे. यात आता पोलिसांनी काही जणांना अटक केली असून, तब्बल १३ पिस्तुलांसह एक बोलेरो गाडीही जप्त केली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून […]
ADVERTISEMENT

सिद्धू मुसेवाला प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या रडारवर आलेल्या संतोष जाधवचे एक-एक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणात केलेल्या तपासातून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असून, त्याच्या टोळीतील सदस्यांची धरपकड पोलिसांकडून केली जात आहे. यात आता पोलिसांनी काही जणांना अटक केली असून, तब्बल १३ पिस्तुलांसह एक बोलेरो गाडीही जप्त केली आहे.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून संतोष जाधव आणि लॉरेन्स टोळीतील लॉरेन्स डिसोझा यांच्यातील कनेक्शनबद्दलची माहिती मिळाली आहे. त्यामुळे संतोष जाधवमुळे पुणे परिसरात पसरत चाललेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगचा बिमोड करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
संतोष जाधवचं खंडणीप्रकरण कसं आलं समोर?
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर (ता. जुन्नर, जि. पुणे)येथील वॉटर प्लांट व्यावसायिक फिर्यादीस ५ ते ६ महिन्यांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभुमी असणाऱ्या संतोष जाधव याने व्हॉटस् अपवर व्हॉईस कॉल करून ५० हजार रूपये हप्ता मागितला होता. हप्ता दिला नाही तर गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिली होती.