Nagpur Crime : समता सैनिक दलाच्या सुनील जवादे यांची अल्पवयीन आरोपींकडून निर्घृण हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समाजातील तरुणांनी आपले वर्तन चांगले ठेवावे याकरिता मार्गदर्शन करणारे नागपुरातील समाजसेवक आणि समता सैनिक दलाचे निमंत्रक सुनील जवादे यांची निर्घृण हत्या झाली आहे. चार अल्पवयीन आरोपींनी जवादे यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

आज पहाटे चार ते पाच वाजल्याच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकून त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न या हत्येच्या निमित्याने उपस्थित झाला आहे.

समाजसेवक सुनील जवादे यांना समाजात चांगला मान होता,ते समता सैनिक दलाचे निमंत्रक देखील होते. कुटुंबाचा उदरनिर्वाहा करण्यासाठी ते भाजी विकण्याचा व्यवसाय करायचे. आज पहाटे ते घरा बाहेर पडले असता चारही अल्पवयीन आरोपी त्यांच्या मागावर दबा धरुन बसले होते. काही काळण्याच्या पूर्वीच आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली,ज्यामुळे त्यांना आरोपींकडून होणारा वार दिसला नाही. यानंतर आरोपींनी जवादे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना रक्तबंबाळ केलं. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले.

हे वाचलं का?

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्खळी धाव घेतली, परंतू तोपर्यंत जवादे यांचा मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

शाळकरी मुलांचे मार्गदर्शन करणे पडले महागात :-

ADVERTISEMENT

समाजसेवक सुनील जवादे हे शाळकरी मुलांना नेहमीच मार्गदर्शन करायचे. मात्र त्यांच्या या चांगल्या सवयीमुळे काही तरुण दुखावले होते,ज्यामुळे त्यांचा सुनील जवादे यांच्या सोबत काही दिवसांपूर्वी वाद देखील झाला होता, त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी आज पहाटे चार आरोपींनी त्यांच्यावर वार करत हत्या केली. या चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT