समाज मंदिराच्या बांधकामाला विरोध, गावकऱ्यांचा पोलीस पाटलाच्या कुटुंबावर बहिष्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकोला: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, जात-पात आणि सामाजिक बहिष्काराच्या घटना सुरुच असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. अकोल्यात पातुर तालुक्यातील सोनूना गावात गावकऱ्यांनी गावच्या पोलीस पाटलाच्या कुटुंबावरच सामाजिक बहिष्कार घातला आहे. शेताजवळ बांधण्यात आलेल्या समाज मंदीराला पोलीस पाटलाने विरोध केल्यामुळे हा बहिष्कार घालण्यात आल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

जात पंचायतीचा विळखा : पंचांची थुंकी चाटायला लावल्याची शिक्षा केल्याचा पीडितेचा आरोप

रमेश कदम हे सोनूना गावचे पोलीस पाटील आहेत. कदम यांच्या शेताला लागून गावकऱ्यांनी एक मंदीर कम सामाजिक सभागृह उभारलं आहे. परंतू हे बांधकाम आपल्या मालकीच्या जागेत असून कदम यांनी या बांधकामाला विरोध दर्शवला. यानंतर गावकऱ्यांनी आपल्यावर बहिष्कार घातला असून आपल्या परिवाराला किराणा, दळण, पाणी देणं बंद करण्यात आल्याची माहिती रमेश कदम यांनी मुंबई तक शी बोलताना दिली.

हे वाचलं का?

सोनूना गावातील इतर गावकऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी रमेश कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. याआधीही अकोल्याच्या ग्रामीण भागात जातपंचायतीची अनेक प्रकरणं समोर आली होती. त्यात सामाजिक बहिष्काराचं आणखी एक प्रकरण समोर आल्यामुळे सरकारने अशा घटनांविरोधात कडक कायदा करण्याची मागणी केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT