सोनाली फोगाटच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा, पोस्टमॉर्टेमचा अहवाल समोर

मुंबई तक

टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाटचा मृत्यू मंगळवारी झाला. सुरूवातीला हा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता पोस्टमॉर्टेमचा रिपोर्टमध्ये नवी माहिती समोर आली आहे. सोनालीच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केल्याच्या खुणा आहेत. धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा तिच्या शरीरावर आहेत. यानंतर पोलिसांनी सोनालीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कलम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाटचा मृत्यू मंगळवारी झाला. सुरूवातीला हा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता पोस्टमॉर्टेमचा रिपोर्टमध्ये नवी माहिती समोर आली आहे. सोनालीच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केल्याच्या खुणा आहेत. धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा तिच्या शरीरावर आहेत. यानंतर पोलिसांनी सोनालीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कलम ३०२ अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे.

सोनालीच्या शरीरावर जखमांच्या खुणा

सोनाली फोगाटच्या मृतदेहावर धारदार वस्तूने जखमा केल्याच्या खुणा आहेत. या प्रकरणी आता खुनाचा FIR दाखल केल्यानंतर पोलीस या घटनेसंदर्भातले इतर पैलूही तपासत आहेत. सुरूवातीला हा हार्ट अटॅकने झालेला मृत्यू आहे असं वाटत होतं. मात्र आता या प्रकरणाला नवं वळण लागल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोस्टमॉर्टेमचा अहवाल समोर आला आहे त्यामध्ये जखमा असल्याचं समोर आल्याने हे प्रकरण कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोनाली फोगाटच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण राजकीय षडयंत्र

गोवा पोलिसांना जी पोस्टमॉर्टेम रिपोर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये मृत्यूचं कारण दिलेलं नाही. मात्र सोनालीच्या शरीरावर धारदार वस्तूने जखमांच्या खुणा आहेत. सोनालीचा व्हिसेरा आणि टिश्यू हे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सोनालीच्या कुटुंबाने गंभीर आरोप केला आहे की हे सगळं एक राजकीय षडयंत्र आहे.

रेस्तराँमध्ये काम करत होती सोनाली फोगाट

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सोनाली फोगाट अस्वस्थ होती. ज्यानंतर तिला गोवा येथील अंजुनाच्या सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं. गोवा डिजीप जसपाल सिंह यांनीही सांगितलं की सोनाली फोगाट अंजुना याच ठिकाणी असलेल्या Curlies रेस्तराँमध्ये काम करत होती. या दरम्यान जेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp