कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी लवकरच निवडणुका, प्रभाग रचना जाहीर
मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच होणार आहे. कारण या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे इ.चा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सविस्तर माहिती आज (1 फेब्रुवारी) एका पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली आहे. मागील […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच होणार आहे. कारण या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे इ.चा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सविस्तर माहिती आज (1 फेब्रुवारी) एका पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली आहे.
मागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पॅनल पद्धतीने होणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगर निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला.
महापालिका मुख्यालय, प्रभाग क्षेत्र कार्यालयासह पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर हा आराखडा नागरिकांना पाहता येणार असून यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती सूचना नोंदवता येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे.
एकूण 133 सदस्य असणार असून यामधील 67 जागा महिलांसाठी आहेत. एकूण 44 प्रभाग असून यामध्ये 3 सदस्यांचे 43 प्रभाग असून सरासरी लोकसंख्या 34 हजार 258 आहे. तर 4 सदस्यांचा 1 प्रभाग आहे. ही प्रभाग रचना www.kdmcelection.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.