Adani Group : अदानी ग्रुपसाठी दिलासादायक बातमी; या शेअर्समध्ये वाढ
Hindenburg Report : अमेरिकन रिसर्च फर्मच्या अहवालानंतर (American Research Firm) अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी (Adani Group Shares) घसरण झाली होती. या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले होते. अदानी प्रकरणाची भारतासह जगभरात चर्चा सुरू आहे. खरेतर, (Hindenburg) हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाविरुद्ध अहवाल प्रकाशित केला होता आणि त्याच दिवसापासून शेअर्स घसरणीच्या टप्प्यात होते. […]
ADVERTISEMENT

Hindenburg Report : अमेरिकन रिसर्च फर्मच्या अहवालानंतर (American Research Firm) अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी (Adani Group Shares) घसरण झाली होती. या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले होते. अदानी प्रकरणाची भारतासह जगभरात चर्चा सुरू आहे. खरेतर, (Hindenburg) हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाविरुद्ध अहवाल प्रकाशित केला होता आणि त्याच दिवसापासून शेअर्स घसरणीच्या टप्प्यात होते. Adani Group Shares Increase
पण सोमवारी अदानी समूहासाठी एकामागून एक दिलासादायक बातम्या आल्या, त्यामुळे मंगळवारी अदानी समूहाच्या जवळपास सर्वच शेअर्सने आपला मार्ग बदलला. यापैकी दोन स्टॉकमध्ये अप्पर सर्किट्स बसवण्यात आली. अदानी समूहाचे शेअर्स हिरव्या चिन्हात पाहून गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
दोन शेअर्समध्ये सर्किट फिल्टर
सोमवारी NSE ने अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनची सर्किट मर्यादा 5 टक्क्यांवर सुधारित केली होती. याशिवाय, अदानी समूहाने तारण ठेवलेल्या शेअर्स वेळेपूर्वी पूर्तता करण्याची घोषणा केली. यासाठी कंपनी 9185 कोटी रुपये देण्यास तयार आहे.
Adani Group : यूपी सरकारने दिला अदाणी ग्रुपला झटका










