सर्व मुस्लीम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! आमदार अबु आझमींची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातच वादाची ठिणगी पडली आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना बाबरी मशिदीच्या पतनाचा उल्लेख केला. विरोधी पक्षाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली असताना त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी बाबरी मशिद पडली तेव्हा सर्व येरेगबाळे पळून गेले होते आणि फक्त बाळासाहेब तिकडे ठाम उभे होते असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या याच भाषणावर आमदार अबु आझमी यांनी आक्षेप घेतला असून सरकारमधील सर्व मुस्लीम मंत्र्यांनी आपले राजीनामे द्यावे अशी मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

“महाविकास आघाडी सरकार सेक्युलर नाहीये. हे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर बनलं होतं, परंतू मुख्यमंत्र्यांना याचा विसर पडलेला दिसतोय. या सरकारमधील सर्व मुस्लीम मंत्र्यांनी आपले राजीनामे द्यायला हवेत. मुख्यमंत्री सभागृहात मंदीर-मशिदीबद्दल बोलत होते. बाबरी मशिद पतनाच्या अपराधाबद्दल ते बोलत होते, जे योग्य नाही”, अशा शब्दांमध्ये अबु आझमी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री NRC, CAA आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा विसरले आहेत. त्यांना याची लाज वाटली पाहिजे आणि यासाठी त्यांनी ताबडतोक राजीनामे द्यायला हवेत. या बाबतीत शरद पवारांना पत्र लिहणार असल्याचंही अबु आझमी यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – मुंबईतली कराची बेकरी बंद, कार्यकर्ते मैदानात; मनसेने हात झटकले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT