ST Strike : धुळे आगारातून बाहेर पडणाऱ्या 4 बसेस फोडल्या

मुंबई तक

दिवाळीपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप अद्यापही सुरूच आहे. एसटी कामगार आणि सरकारमधील कोंडी अद्याप फुटलेली नसून, दिवसेंदिवस संप चिघळताना दिसत आहे. असं असलं तरी काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतत असल्याचं चित्र असून, बसेसही धावत आहेत. धुळे आगारातून 14 बसेस सोडण्यात आल्या. मात्र, 4 बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिवाळीपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप अद्यापही सुरूच आहे. एसटी कामगार आणि सरकारमधील कोंडी अद्याप फुटलेली नसून, दिवसेंदिवस संप चिघळताना दिसत आहे. असं असलं तरी काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतत असल्याचं चित्र असून, बसेसही धावत आहेत. धुळे आगारातून 14 बसेस सोडण्यात आल्या. मात्र, 4 बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागण्यांसाठी 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. धुळ्यातही एसटी कामगार संपावर आहेत. दरम्यान धुळे आगार प्रशासनाने बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. सकाळी 14 बसेस आगारातून सोडण्यात आल्या.

बसेस सोडण्याच्या पार्श्वभूमीवर आगार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. बसेस जाणाऱ्या मार्गांवरही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, बसेस मार्गस्थ होत असताना 4 बसेसना लक्ष्य करण्यात आलं. अज्ञातांकडून बसेसवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यानं पोलिसांची धांदल उडाली. या घटनेत एक एसटी कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp