लालपरी धावली! महागाई आणि घरभाडे भत्ता वाढणार; एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवाळी तोंडावर आलेली असताना आणि प्रवाशांची वर्दळ वाढलेली असतानाच एसटी कर्मचारी संपावर गेले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाची दखल घेत राज्य सरकारने महागाई आणि घरभाडे भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी रात्रीपासून संप बंद झाल्यानं राज्यातील लाखो प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ADVERTISEMENT

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मागण्यांकडे सरकारचं लक्ष्य वेधण्यासाठी संप आणखी तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता. मात्र, सरकारने वेळीच हस्तक्षेप करत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचं आश्वासन दिल्यानंतर संप मिटला.

एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून संपाचं हत्यार उपसलं होतं. या संपाची दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी मुंबईतील मंत्रालयात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृतीची बैठक घेतली. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्री परब यांच्याशी चर्चा झाली. या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ करू, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली.

हे वाचलं का?

एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडणारा आर्थिकभार, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करुन एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वार्षिक वेतनवाढीसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक असून याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येईल, असं परब यांनी स्पष्ट केलं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या…

ADVERTISEMENT

१) एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं.

ADVERTISEMENT

२) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे.

३) वाढीव घरभाडे ८, १६, २४ या दराने देण्यात यावं.

४) सर्व सणांना १२,५०० रुपये उचल मिळायला हवी.

५) वार्षिक वेतन वाढ २ टक्क्यांऐवजी ३ टक्के देण्यात यावी.

६) न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन देण्यात यावं.

७) प्रलंबित वेतन वाढ देण्यात यावी. त्याचबरोबर कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात यावी, यासह ईतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT