राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्च 2021 रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. मात्र, याआधी आज (5 मार्ज) राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा मोठा फटका अर्थक्षेत्राला बसला आहे. ज्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था ही उणे 8 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

मात्र, असं असलं तरीही आर्थिक पाहणी अहवालानुसार कोव्हिड काळातही सर्वात कमी परिणाम हा कृषी आणि त्यांच्याशी संलग्न क्षेत्रावर झाल्याचं म्हटलं आहे. कृषी हे कमी परिणाम होणारं एकमेव क्षेत्र असून त्यात सकारात्मक वाढ झाल्याचं पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. चांगल्या मान्सूनमुळे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहे. पीक क्षेत्रात 16.2 टक्के, पशुसंवर्धन 4.4 टक्के, मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेती 2.6 आणि वन आणि लाकूड तोडणी क्षेत्रात 5.7 टक्के वाढ अपेक्षित आहे. कृषी संलग्न कार्ये क्षेत्रात सन 2020-21 मध्ये 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर उद्योग क्षेत्रात उणे 11.3 तर सेवा क्षेत्रात उणे 9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन: पाहा पाचव्या दिवसाचं कामकाज

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे बांधकाम आणि वस्तुनिर्माण क्षेत्राला मोठा फटका यावेळी बसला आहे. बांधकाम क्षेत्रात उणे 14.6 टक्क्यांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1 लाख 56 हजार 925 कोटींची घट असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचा जीडीपी यंदा ५.७ टक्के तर देशाचा ५ टक्के राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

राज्याचा संपूर्ण आर्थिक पाहणी अहवाल

ADVERTISEMENT

आर्थिक पाहणी अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे:

ADVERTISEMENT

  • वस्तूनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रावर कोरोना महामारीचा मोठा आघात, त्यात अनुक्रमे उणे 11.8 आणि उणे 14.6 टक्के वाढ अपेक्षित आहे.

  • व्यापार, हॉटेल्स व उपाहारगृहे आणि वाहतूक क्षेत्रावर देखील मोठा परिणाम झाला असून सेवा क्षेत्रात उणे 9.0 टक्के वाढ अपेक्षित आहे.

  • नवीकरणीय उर्जेच्या स्थापित क्षमतेत राज्य देशाच चौथ्या क्रमांकावर

  • 2019-20 मध्ये प्रमुख पेट्रोलियम उत्पादनांच्या वापरामध्ये देशात राज्य दुसऱ्या क्रमांकावर

  • देशातील इंटरनेट ग्राहकांची संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2020 अखेर राज्यात इंटरनेट ग्राहकांची संख्या 9.7 कोटी आहे.

    • follow whatsapp

      ADVERTISEMENT