राज्यात शाळा सुरु करण्याच्या दिशेने सरकारचं पहिलं पाऊल, नवीन नियमावली जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये किंवा ज्या गावांत कोरोनाचा प्रभाव कमी आहे अशा गावांत टप्प्याटप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १५ जुलैपासून राज्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. ‘चला मुलांना, शाळेला चला’ या मोहीमेची घोषणा राज्य सरकारने केली आहे. शाळा सुरु करण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापूर्वी पालकांची लेखी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातलं परिपत्रक जाहीर केलं आहे. १५ जुलैपासून शाळा सुरु करण्यासाठी काही निकष आखून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीत गावचे तलाठी, शाळेचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचा समावेश असणार आहे.

आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घ्यावी लागणार आहे विशेष काळजी –

हे वाचलं का?

  • शाळेचे वर्ग, आतील साधने आणि शाळेच्या वाहनांचं सॅनिटायजेशन

  • शाळा आणि परिसरातील कचऱ्याची नियमीत विल्हेवाट लावणं बंधनकारक

  • ADVERTISEMENT

  • साबण, हँडवॉश आणि स्वच्छ पाण्याची सोय

  • ADVERTISEMENT

  • गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना मनाई

  • पालक आणि शिक्षक यांच्यातल्या बैठका फक्त ऑनलाईन होतील.

  • शाळा सुरु करण्यापूर्वी समितीला या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे –

    • संबंधित गावामध्ये एक महिना कोरोना रुग्ण आढळलेला नसावा.

    • शिक्षकांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने करावे.

    • लसीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी पाठपुरावा करावा.

    • गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश नाही.

    • एकही विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तातडीने शाळा बंद करुन निर्जंतुकीकरण करावे.

    • कोरोनाग्रस्त विद्यार्थ्याला क्वारंटाइन करुन उपचार करावेत.

    हे नियम पाळावेच लागतील –

    • विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आणि वेगवेगळ्या वेळांमध्ये शाळेत बोलावणे

    • शिकवताना महत्वाच्या विषयांना प्राधान्य देणे

    • एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये किमान ६ फुटांचं अंतर

    • एका वर्गात जास्तीत जास्त २० विद्यार्थी

    याचसोबत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना त्याच गावात राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता येणार नाही. त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपलं RTPCR चाचणीचं प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT