पत्रातून परमबीर सिंग यांचे गंभीर आरोप, पण खाली सहीच नाही ! राज्य सरकार चौकशी करणार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रातून केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत परमबीर सिंग यांनी देशमुखांनी सचिन वाझेंकडून १०० कोटींची मागणी केल्याचं आपल्या पत्रात म्हटलंय. संध्याकाळपासून सर्व प्रसारमाध्यमांमध्ये हे पत्र चांगलंच व्हायरल झालंय. आपल्या आठ पानी पत्राची कॉपी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, […]
ADVERTISEMENT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रातून केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत परमबीर सिंग यांनी देशमुखांनी सचिन वाझेंकडून १०० कोटींची मागणी केल्याचं आपल्या पत्रात म्हटलंय. संध्याकाळपासून सर्व प्रसारमाध्यमांमध्ये हे पत्र चांगलंच व्हायरल झालंय. आपल्या आठ पानी पत्राची कॉपी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप-मुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरीक्त सचिव आणि राज्यपालांच्या सचिवांना पाठवली. परंतू या पत्राखाली परमबीर सिंग यांनी सहीच केलेली नव्हती.
परमबीर यांचे गंभीर आरोप, अनिल देशमुख अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार !
मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेल आयडीवर हे पत्र paramirs3@gmail.com या इमेल आयडीवरुन प्राप्त झालं. परमबीर यांची सही नसलेलं पत्र मिळाल्यानंतर गृह विभागाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वास्तविक पाहता परमबीर सिंग यांचा आयपीएस अधिकाऱ्यांसाठी दिलेला अधिकृत इमेल आयडी parimbirs@hotmail.com या नावाने आहे. त्यामुळे प्राप्त झालेला इमेल तपासून पाहणे गरजेचं असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं आहे. त्यामुळे पत्राची आता राज्य सरकार चौकशी करणार असल्याचं स्पष्ट झालंय.
‘मुंबईत सतराशे बार आहेत, रेस्टॉरंट आहेत; ४०-५० कोटी सहज जमू शकतात!’
