Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध, पाहा काय सुरु, काय बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन (Maharashtra Lockdown) प्रमाणेच कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. याला सरकारने ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) असे नाव दिले आहे. इतकेच नाही तर लोकांमध्ये भीती पसरु नये म्हणून लॉकडाऊनऐवजी कोरोना कर्फ्यू (Corona Curfew) म्हटलं जात आहे. महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. जे 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.

या कालावधीत संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. घरातून आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडण्यास बंदी आहे. या संपूर्ण कोरोना कर्फ्यू दरम्यान काय खुले राहील आणि काय बंद राहील जाणून घ्या सविस्तरपणे: (strict restrictions like lockdown in maharashtra see what will be open and whats will be closed)

महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने 15 दिवसांचा कोरोना कर्फ्यू लावला आहे. हा कर्फ्यू 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून सुरू झाला आहे जो 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. यावेळी कलम 144 लागू असल्याने एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. फक्त अत्यावश्यक सेवा कार्यरत असतील. ज्यांना या कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे ते सुद्धा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यानच बाहेर पडू शकतात.

Mumbai Lockdown: मुंबईत कठोर लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद

ADVERTISEMENT

अत्यावश्यक सेवांमध्ये कशाकशाचा समावेश असेल?

ADVERTISEMENT

अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णालये, दवाखाने, निदान केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, मेडिकल स्टोअर्स, फार्मा कंपन्या आणि इतर वैद्यकीय आरोग्य सेवा या सर्वांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पशुवैद्यकीय सेवा, पाळीव प्राण्यांचे केअर शेल्टर आणि पाळीव खाद्यपदार्थांचे दुकान खुले राहतील. किराणा, भाजीपाला दुकान, फळांचे दुकान, डेअरी, बेकरी व इतर खाद्यपदार्थांची दुकानेही खुली असतील. कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस सेवा देखील सुरू राहतील. सर्व मीडियाशी संबंधित सेवा आणि पेट्रोल पंप, कार्गो सेवा आणि आयटी संबंधित सेवा देखील सुरू राहतील.

काय-काय सुरु असेल?

वीज कार्यालये, गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपाल सेवा चालू राहतील. सार्वजनिक वाहतूकही सुरु असेल. तथापि, ऑटो रिक्षात चालक व्यतिरिक्त दोनच लोक बसू शकतात. विमान, रेल्वे आणि सार्वजनिक बस सेवा देखील सुरू राहतील. घरकाम करणाऱ्या व्यक्ती, चालक, कुक, हेल्पर यासारख्या कामगारांनाही सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत प्रवास करण्याची मुभा असेल.

याशिवाय सर्व प्रकारची सरकारी कार्यालये, सरकारी व खासगी बँका, विमा कंपन्या, डेटा सेंटर, आयटी कंपन्या खुल्या असतील. हॉटेल, रेस्टॉरंट्सदेखील खुली असतील, परंतु ते फक्त होम डिलिव्हरी करू शकतात. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्येही बसण्याची आणि खाण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे ढाब्यांवर व रस्त्यांवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खुले असतील. पण इथेही फक्त पार्सल सुविधा सुरु असेल. स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्या होम डिलिव्हरी करु शकतात.

15 दिवसांचा Lockdown नाही, महाराष्ट्राला 200 दिवसांच्या लसीकरणाची गरज

अत्यावश्यक सेवेमध्ये वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांनाही सूट देण्यात आली आहे. येथे पूर्ण क्षमतेने काम केले जाईल. पण उत्पादन करणार्‍या कंपनीला कामगार व कर्मचार्‍यांची व्यवस्था करावी लागेल. त्याचप्रमाणे कारखान्यांमध्येही काम सुरूच राहणार असून कामगारांनाही येथे सामावून घेण्याची व्यवस्था वेगळी करावी लागेल. जर कोणताही कामगार कोरोना पॉझिटिव्ह आला तर कारखाना बंद होईल. बांधकाम व्यवसाय देखील सुरू राहील.

काय-काय बंद असेल?

कोरोना कर्फ्यू दरम्यान सिनेमा हॉल, थिएटर, उद्यानं, क्लब, जलतरण तलाव, जिम आणि क्रीडा संकुल बंद राहतील. चित्रपट किंवा मालिकांचे शूटिंग होणार नाही. अशी दुकाने, मॉल्स आणि शॉपिंग मॉल्स देखील बंद केली जातील, जी अत्यावश्यक सेवांमध्ये येत नाहीत. स्पा आणि सलून देखील बंद राहतील. बीच किंवा बाग यासारखी सार्वजनिक ठिकाणे देखील उघडणार नाहीत.

शाळा व महाविद्यालयेही बंद राहतील. परंतु, जर कोणती आवश्यक परीक्षा असेल तर ती मात्र होऊ शकते. यावेळी विद्यार्थी परीक्षेसाठी जाऊ शकतात. यासाठी त्यांना हॉलतिकिट सोबत बाळगावं लागेल. सर्व प्रकारच्या खाजगी प्रशिक्षण संस्था देखील बंद राहतील.

धार्मिक स्थळंही राहणार बंद

1 मे पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व धार्मिक स्थळही बंद राहतील. म्हणजे आपल्याल घरी राहूनच सगळ्या पूजापाठ करावे लागणार आहेत. दरम्यान, धार्मिक स्थळी काम करणारे कर्मचारी आपले काम नेहमी सरकारने ठरवून दिलेल्या गाईडलाइननुसार सुरु ठेवू शकतात. पण इतर कुणालाही तिथे येण्यास परवानगी नसेल.

याशिवाय कोणत्याही प्रकारचा धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही. जर कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यात 200 पेक्षा जास्त लोक त्यामध्ये एकत्र येऊ शकत नाहीत.

लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी काय आहेत नियम?

लग्न आणि विवाह सोहळ्यांवर बंदी नसेल पण लग्नात फक्त 25 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. हे देखील तेच लोकं असतील ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे किंवा ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. याच प्रमाणे अत्यंसंस्कारासाठी देखील 20 हून अधिक लोकांना परवानगी नसेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT