Pandharpur: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत घेण्यात आला एक अत्यंत महत्वाचा निर्णय
पंढरपूर: महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणीच्या (Vitthal-Rukmini Mandir) पुरातन मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची 8 जुलै रोजी नवीन भक्त निवासामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात येत्या 12 जुलै रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार […]
ADVERTISEMENT

पंढरपूर: महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणीच्या (Vitthal-Rukmini Mandir) पुरातन मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची 8 जुलै रोजी नवीन भक्त निवासामध्ये बैठक झाली.
बैठकीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात येत्या 12 जुलै रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे अतिशय पुरातन आहे. मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मूळ स्वरुपातील सौंदर्य अबाधित ठेवत, मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
संपूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये संत नामदेव पायरी पासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंतच्या मूळ मंदिरामध्ये आवश्यक ते बदल देखील केले जाणार आहेत. यासाठी पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. ही माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.