Suhana Khan: भाऊ आर्यनला जामीन मंजूर होताच सुहाना खानने instagram वर ‘हा’ फोटो केला शेअर
मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर काल (28 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे संपूर्ण खान कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. 2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई-गोवा क्रूझवर केलेल्या छापेमारी दरम्यान आर्यन खानला ताब्यात घेऊन अटक केली होती. तेव्हापासून संपूर्ण खान कुटुंबीय हे […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर काल (28 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे संपूर्ण खान कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. 2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई-गोवा क्रूझवर केलेल्या छापेमारी दरम्यान आर्यन खानला ताब्यात घेऊन अटक केली होती. तेव्हापासून संपूर्ण खान कुटुंबीय हे तणावात होतं. मात्र, आता आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय खूपच खुश असल्याचं दिसून येत आहे.
आर्यनची बहीण आणि शाहरुखची मुलगी सुहाना हिने काल इंस्टाग्रामवर एका फोटो शेअर करुन आपला आनंद व्यक्त केला आहे. गेले अनेक दिवस सुहाना आपल्या इंस्टाग्रामवर काहीही शेअर करत नव्हती. मात्र, आर्यनच्या जामिनाबाबत माहिती मिळताच तिने भाऊ आर्यन आणि वडील शाहरुख खान यांच्यासोबत एक जुना फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये सुहाना आणि आर्यन अगदी लहान असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये दोघांचाही खोडकरपणा दिसतो आहे. यावेळी शाहरुख आपल्या दोन्ही मुलांसोबत खेळताना दिसतो आहे.
दरम्यान, हा फोटो शेअर करताना सुहानाने फक्त ‘आय लव्ह यू’ एवढंच कॅप्शन टाकलं आहे. सुहानाने हा फोटो शेअर केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आणि सुहानाच्या काही मित्र-मैत्रिणींनी त्यावर कमेंट केल्या आहेत. यावेळी अनेकांनी आनंदही व्यक्त केला आहे.
आर्यन अद्यापही तुरुंगातच, लवकरच परतणार घरी
ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला असला तरी तो अद्याप घरी परतलेला नाही. आर्यनच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या जामिनाची कागदपत्रे आज येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आर्यनला आज किंवा शनिवारी घरी परतता येईल.
वकील मुकुल रोहतगी यांनीही सांगितले होते की, आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते या खटल्यासंदर्भात सतत वकिलांशी चर्चा करत होता.
Shah rukh Khan: आर्यन खानला जामीन मंजूर झाला तेव्हा शाहरुख ‘मन्नत’मध्ये नव्हता!
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच होणार सुटका
न्यायमूर्ती सांबरे यांनी शुक्रवारी सविस्तर आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर, तो आदेश विशेष एनडीपीएस न्यायालयात परत पाठवला जाणार आहे. त्यानंतर एनडीपीएस कोर्ट सुटकेचा आदेश जारी करेल आणि त्यानंतर आर्यन खानची मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सुटका होईल. जर आज (29 ऑक्टोबर) 5.30 वाजण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाकडे सुटकेचा आदेश दिल्यास आर्यन खान तुरुंगातून बाहेर येईल.