सुहास कांदे यांनी नाराजीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाले मी मरेपर्यंत एकनाथ शिंदेंसोबतच
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे दादा भुसेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र नाराजीच्या चर्चांवर आता सुहास कांदे यांनी मौन सोडलं आहे. मी नाराज नाही असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. दादा भुसे आणि सुहास कांदे या दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता सुहास कांदे यांनीच […]
ADVERTISEMENT
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे दादा भुसेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र नाराजीच्या चर्चांवर आता सुहास कांदे यांनी मौन सोडलं आहे. मी नाराज नाही असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. दादा भुसे आणि सुहास कांदे या दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता सुहास कांदे यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काय म्हटलं आहे सुहास कांदे यांनी?
मी नाराज नाही, मात्र मला पक्षाच्या कुठल्या काही कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. कुठल्याही चर्चेत मला घेतलं जात नाही. कुठल्याही निवडीत माझं मत घेतलं जात नाही. माझं एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा व्यक्ती आहे. मी मरेपर्यंत त्यांच्यावर माझं प्रेम असणार आहे. मला वाटतं आहे की आता जे काही सुरू आहे त्यात एकनाथ शिंदे साहेब लक्ष घालतील आणि सुधारणा होईल.
हे वाचलं का?
इतिहास पाहिला तर पीआरओ, पालकमंत्री बोलवतात. मात्र यावेळी तसं झालं नाही. नाशिक जिल्ह्यात ज्या निवडणुका झाल्या त्याबद्दलही काही कळलं नाही. मी निवड प्रकियेत मी कुठेच नव्हतो. ज्यामुळे पक्ष वाढेल असे लोक घेतलेले नाहीत असं मला वाटतं आहे. स्थानिक अडचणींमुळे हे सगळं थांबलं आहे असं मला वाटतं असंही सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाने कार्यालय उघडलं हेदेखील मला माहित नाही असंही सुहास कांदे यांनी म्हटलं आहे. मी नाराज नाही. दादा भुसे आमचे नेते आहेत. मी त्यांचा आदर करतो. २० वर्षे ते आमदार आहेत. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. मी कधीही त्यांच्यावर नाराज राहणार नाही असंही सुहास कांदे यांनी म्हटलं आहे.
चर्चा काय रंगल्या होत्या?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदा नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेले दादा भुसे यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्यात मात्र परिस्थिती बदलली आहे. कारण नांदगावचे आमदार सुहास कांदे हे नाराज असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या. दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता सुहास कांदे यांनीच आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT