पुण्यातल्या FTII मध्ये २५ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, महिन्याभरातली दुसरी घटना
पुण्यातल्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये २५ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. मूळची नैनितालची असणारी ही विद्यार्थिनी होती. तिचा मृतदेह एफटीआयआयच्या वसतिगृहातल्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत. एक महिन्याच्या आतली ही दुसरी घटना आहे. FTII मध्ये नेमकी काय घडली घटना? फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट […]
ADVERTISEMENT
पुण्यातल्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये २५ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. मूळची नैनितालची असणारी ही विद्यार्थिनी होती. तिचा मृतदेह एफटीआयआयच्या वसतिगृहातल्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत. एक महिन्याच्या आतली ही दुसरी घटना आहे.
ADVERTISEMENT
FTII मध्ये नेमकी काय घडली घटना?
फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने गुरूवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना घडली. कामाक्षी बोहरा असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती मूळची नैनितालची आहे. आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. कामाक्षी २०१९ पासून FTII च्या वसतिगृहात राहण्यास होती. ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अॅक्टिंग हा कोर्स करत होती.
गुरूवारी कामाक्षी वर्गात न आल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थिनींना ती राहात असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. ही माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
हे वाचलं का?
नैराश्यातून उचललं पाऊल?
या विद्यार्थिनीने नैराश्यातून आत्महत्येचं पाऊल उचललं आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. मागच्याच महिन्यात म्हणजेच ५ ऑगस्टला याच वसतिकगृहातल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. अशात महिन्याभरात आत्महत्येची दुसरी घटना समोर आली आहे.
नेमकी काय घडली घटना?
कामाक्षी हिला क्लास होता. मात्र ती क्लासला उपस्थित राहिली नव्हती. ती का आली नाही हे पाहण्यासाठी शिक्षकांनी तिच्या रूमवर पाठवले. त्यावेळी तिने खोलीतील पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेची माहिती डेक्कन पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
मागच्या महिन्यात एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे एफटीआयआयमध्ये ही दुसऱ्यांदा आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. विद्येच्या माहेरघरात आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढत असून यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात असून मुलांच्या मानसिकतेचा देखील विचार होणे गरजेचे आहे. या प्रकारणी अधिक तपास डेक्कन पोलिसांकडून केला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT