Sulli Deals आणि Bulli Bai प्रकरणातल्या आरोपींना जामीन मंजूर, कोर्ट म्हणतं त्यांनी…..
Sulli Deals आणि Bulli Bai या दोन App वरून मुस्लिम महिलांवर टीका करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज बिश्नोई या दोघांना CMM कोर्टाने मानवीय आधारावर जामीन मंजूर केला आहे. नीरज हा Bulli Bai प्रकरणातील मुख्य आरोपी आहे तर ओंकारेश्वर ठाकूर हा सुल्ली डील्सचा निर्माता आहे. आरोपींच्या विरोधात […]
ADVERTISEMENT
Sulli Deals आणि Bulli Bai या दोन App वरून मुस्लिम महिलांवर टीका करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज बिश्नोई या दोघांना CMM कोर्टाने मानवीय आधारावर जामीन मंजूर केला आहे. नीरज हा Bulli Bai प्रकरणातील मुख्य आरोपी आहे तर ओंकारेश्वर ठाकूर हा सुल्ली डील्सचा निर्माता आहे. आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल झाली आहे, मात्र या आरोपींनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा अपराध केला आहे त्यामुळे दीर्घ काळ त्यांना तुरुंगात ठेवणं योग्य होणार नाही त्यामुळेच त्यांना जामीन देण्यात येतो आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.
Bulli Bai App : मास्टरमाईंड असलेल्या 18 वर्षांच्या तरूणीला माफ करा, जावेद अख्तर यांचं ट्विट चर्चेत
या दोन्ही मुख्य आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही तो सशर्त जामीन आहे. जामिनावर तुरुंगाबाहेर असताना या दोन्ही आरोपींना देश सोडता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसंच जेव्हा कोर्ट सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगेल तेव्हा आरोपींना यावं लागेल ही अटही ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातले जे तपास अधिकारी आहेत त्यांना कुठे राहात आहात, कुठे प्रवास करत आहात त्याचे तपशील द्यावे लागतील. एवढंच नाही तर फोनही सातत्याने सुरू ठेवावा लागेल. या प्रकरणातल्या ज्या पीडित आहेत त्यांच्याशी कोणताही संपर्क आरोपींना ठेवता येणार नाही अशा सगळ्या अटींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Bulli Bai app अॅप नेमकं काय आहे
ADVERTISEMENT
काही महिन्यांपूर्वी Bulli Bai नावाचे एक अॅप तयार करण्यात आले होते. त्या अॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. त्यांच्या विरोधात द्वेष पसरवला जात होता. एवढंच नव्हे तर अत्यंत त्यांच्यासंबंधी घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक हे अॅप त्याच पद्धतीने बनविण्यात आले होते जसे Sulli deal तयार करण्यात आले होते. GitHub वर Sulli deal लाँच करण्यात आलं होतं. आता Bulli Bai app देखील GitHub वर लॉन्च करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
Bulli Bai app ची मास्टरमाईंड निघाली ‘या’ राज्यातील महिला, नेमकं प्रकरण काय?
शंभर महिलांना केलं गेलं टार्गेट
ट्विटर आणि फेसबुकवर दमदारपणे देशातील परिस्थितीबाबत आपली परखड मतं मांडणाऱ्या शेकडो महिलांना Bulli Bai app वर टार्गेट करण्यात आले आहे. या पीडितांमध्ये मीडियासह इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्या निकृष्ट अॅप आणि प्लॅटफॉर्मवर त्यांची नावे आणि फोटो वापरण्यात येत असल्याची तक्रार या सर्व महिलांनी केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या अॅपच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण बरंच गाजलंही होतं. त्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आली होती. आता याच प्रकरणातल्या दोन मुख्य आरोपींना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.
ADVERTISEMENT