Rave Party : त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी; आर्यन खानच्या अटकेवर सुनील शेट्टीचं मत
मुंबईच्या समुद्रात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एनसीबीने रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही आढळून आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आर्यन खानची चौकशी सुरु आहे. आर्यन खान पार्टीत सापडल्यानं शाहरूख खानवरही टीका होत असून याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. […]
ADVERTISEMENT
मुंबईच्या समुद्रात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एनसीबीने रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही आढळून आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आर्यन खानची चौकशी सुरु आहे. आर्यन खान पार्टीत सापडल्यानं शाहरूख खानवरही टीका होत असून याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला.
ADVERTISEMENT
मुंबई आणि बॉलिवूडमध्ये रविवारी खळबळ उडाली. ‘एनसीबी’ने मुंबईहून गोव्याला जात असलेल्या क्रूझ जहाजात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर शनिवारी धाड टाकली. शनिवारी रात्री ही माहिती समोर आली. त्यानंतर रविवारी सकाळी आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहितीने सगळीकडे पसरली. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर आणि शाहरुख खानवर टीका केली जात आहे.
सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होत असताना अभिनेता सुनील शेट्टीला एका कार्यक्रमात आर्यन खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनील शेट्टीने संयम बाळगण्याचं आणि जबाबदारीनं वागण्याचं आवाहन केलं.
हे वाचलं का?
सुनील शेट्टी म्हणाला, ‘मी म्हणने की, जेव्हा केव्हा धाड पडते. तिथे अनेक लोकांना पकडलं जातं आणि आपण असा समज करून घेतो की, त्या मुलानं ड्रग्जचं सेवन केलं असेल किंवा या मुलानं ड्रग्ज घेतलंच असेल. पण, कार्यवाही सुरू आहे. त्या मुलाला श्वास तरी घेऊ द्या’, असं मत सुनील शेट्टीनं मांडलं.
Rave Party : आर्यन खानसह रेव्ह पार्टीतील आठ जणांची नावं आली समोर; NCB ने दिली माहिती
ADVERTISEMENT
याच मुद्द्यावर पुढे बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये जेव्हाही काहीतरी होतं, तेव्हा मीडिया सगळ्याच गोष्टींचा धांडोळा घेऊन निष्कर्षावर जाऊन पोहोचते. मुलाला संधी द्या. सत्य काय आहे, ते समोर येऊ द्या. मुलाची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे’, असंही सुनील शेट्टी म्हणाला.
ADVERTISEMENT
#WATCH | When a raid is conducted at a place, many people are taken into custody. We assume that a particular boy must have consumed it (drugs). The process is on. Let's give that child a breather. Let real reports come out: Actor Sunil Shetty on NCB raid at an alleged rave party pic.twitter.com/qYaYSsxkyi
— ANI (@ANI) October 3, 2021
Drugs Case मध्ये आर्यनचं नाव, शाहरुख ‘पठाण’ सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याची शक्यता
अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोहिम उघडलेल्या एनसीबीला मुंबईवरून गोव्याला जाणार्या कॉर्डेलिया क्रूझच्या जहाजावर अंमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. प्रवाशांच्या वेशात गेलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रेव्ह पार्टी सुरू झाल्यानंतर धाड टाकली. यावेळी काहीजण अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आढळून आलं. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या रेव्ह पार्टी प्रकरणात आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं होतं.
Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ला अटक, रेव्ह पार्टीत होता सामील
त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर एनसीबीने दुपारी त्याला अटक केली. दुपारनंतर आर्यन खानसह तिघांना जे.जे. रुग्णालयात चाचणी करण्यासाठी नेण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती एनसीबीकडून टप्प्याने दिली जात आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील काही नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT