सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड Corona Positive

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना कोरोना झाला आहे. डी. वाय चंद्रचूड कोव्हिड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यासोबत एक कर्मचाऱ्यालाही कोरोना झाला आहे. त्यांची प्रकृती सुधारते आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे. न्यायाधीशांची तब्बेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्याही पीठासमोर कोणतीही सुनावणी होणार नाही. देशातील कोव्हिड 19 च्या संकटासंदर्भातली सुनावणी न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाद्वारे होते आहे. गुरूवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र त्या आधीच न्या. चंद्रचूड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

Marathi in Supreme Court : जेव्हा जस्टिस चंद्रचूड हरिश साळवेंना म्हणाले ‘जाऊ द्या!’

कोण आहेत न्या. चंद्रचूड?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

न्या. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकत होते. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली.

बॉम्बे हायकोर्टात वकिली करत असताना चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बँक, ONGC, अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मार्च 2000 मध्ये बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर 2013 ते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले. मे 2016 ला ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.

ADVERTISEMENT

Phone Tapping प्रकरणी IPS रश्मी शुक्लांना अटक होणार नाही-कोर्ट

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या चार जजना कोरोना झाला आहे. त्यापैकी दोन जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर बाकीचे दोन वकील घरी उपचार घेत आहेत. सुप्रीम कोर्टातले अनेकजण 60 ते 65 वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत. या संक्रमित न्यायाधीशांशिवाय सुप्रीम कोर्टाच्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या कामकाजातही काही अडचणी येत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT