अब्दुल सत्तारांच्या अर्वाच्य टीकेवर सुप्रिया सुळेंची २४ तासांनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई तक

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अर्वाच्य शब्द वापरला होत. त्यानंतर अब्दुल सत्तारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट घेतली. या विधानाला २४ तास लोटल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया दिलीये. अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अर्वाच्य शब्द वापरला होत. त्यानंतर अब्दुल सत्तारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट घेतली. या विधानाला २४ तास लोटल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया दिलीये.

अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून निवेदन प्रसिद्ध केलंय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.”

अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त विधान : लोकांच्या प्रतिक्रियांची सुप्रिया सुळेंकडून नोंद

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे”, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिलं पत्र

हे वाचलं का?

    follow whatsapp