प्रशांत किशोरांचा सर्वे; विदर्भवादी नेत्यांना मार्गदर्शन करणार, वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: वेगळ्या विदर्भाच्या मागणीची गेल्या आठ वर्षांपासून थंड बस्त्यात पडलेली मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यावेळी रणनीतीकार प्रशांत किशोर हे वेगळ्या विदर्भासाठी रणनीती आखणार आहेत. 28 सप्टेंबर रोजी प्रशांत किशोर विदर्भवादी नेते, संघटनेचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत.

ADVERTISEMENT

विदर्भवादी नेते डॉ.आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्यावेळी देशमुख यांनी प्रशांत किशोर यांना विनंती केली होती की त्यांनी विदर्भाच्या मुद्द्यासाठी सहकार्य करावे, त्यावेळी किशोर यांनी वेगळ्या विदर्भासाठी रणनीती बनविण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले होते.

प्रशांत किशोर यांचा दोन महिने विदर्भाचा सर्वे

गेले दोन महिने प्रशांत किशोर यांच्या आयपॅक संस्थच्या व्हॅलेंटियर्सनी विदर्भाचा संपूर्ण अभ्यास आणि सर्वे केला आहे. प्रशांत किशोर तो सर्वे विदर्भातील विदर्भवादी नेत्यांसमोर मांडणार आहेत. गेल्या आठ वर्षांपासून थंड बस्त्यात पडलेली वेगळ्या विदर्भाच्या मागणीची चळवळ आता पुन्हा सूरु करण्यात आली असून विदर्भ हे देशातील 30 वे राज्य व्हावे यासाठी विदर्भवादी नेते तयारीला लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही.

हे वाचलं का?

विदर्भाची चळवळ कधीपासून सुरु आहे

वेगळ्या विदर्भाची मागणी मागच्या अनेक दशकांपासून सुरु आहे. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या काळात या चळवळीने गती पकडली होती. परंतु, त्यांना पाहिजे तसे यश आले नाही. आताही विविध पक्ष, संघटना वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन करत असतात. परंतु मागच्या अनेक वर्षांपासून ही मागणी थंड झाली होती. आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ जोर धरु शकते. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी तर बेमुदत उपोषण केले होते. देशमुखांनी विदर्भ यात्रा देखील जाहीर केली होती, परंतु राज्यातील राजकीय घडामोडीमुंळे ती झाली नव्हती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT