सुशांत सिंगच्या ‘त्या’ फ्लॅटला मिळाला भाडेकरू; महिन्याचं भाडं आहे…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत या जगात राहिला नसला तरी तो आजही त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहे. जेव्हापासून सुशांतचे निधन झाले, तेव्हापासून त्याचे फ्लॅट पूर्णपणे निर्जन झाले आहे. त्या फ्लॅटमध्ये कोणी जायला तयार नव्हते. पण नवीन माहितीनुसार, सुशांतच्या फ्लॅटला त्याच्या मृत्यूनंतर सुमारे अडीच वर्षांनी नवीन भाडेकरू मिळाला आहे.

ADVERTISEMENT

बऱ्याच दिवसांनी सुशांतच्या फ्लॅटला नवीन भाडेकरू मिळाला

सुशांत सिंग राजपूत ज्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहत होता, त्या फ्लॅटला मृत्यूनंतर भाडेकरू मिळत नव्हता. लोक तिथे राहायला घाबरत होते. कारण सुशांतने 2020 साली याच फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. या घराबाबत अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. घराचा मालक परदेशात राहतो. अशा परिस्थितीत तो बराच काळ भाडेकरूच्या शोधात होता, मात्र आता त्याचा शोध संपल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच दिवसांनी सुशांतच्या घराला नवीन भाडेकरू मिळाल्याचे वृत्त आहे.

सुशांतच्या फ्लॅटचे भाडे इतके असेल

रिअल इस्टेट ब्रोकरने सांगितले की, सुशांतच्या फ्लॅटचे भाडे महिन्याला 5 लाख रुपये आहे. घरमालकाला सुरक्षा ठेव म्हणून 30 लाख रुपयेही मिळतील. रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंटने इंडिया टुडेला सांगितले, आम्हाला एक भाडेकरू सापडला आहे. गोष्टी फायनल करण्यासाठी आमच्या घरमालकाशी चर्चा सुरू आहे. सुशांतच्या मृत्यूला बराच काळ लोटला आहे, त्यामुळे लोक आता निवांत आहेत, असं तो म्हणाला.

हे वाचलं का?

आलिशान फ्लॅट

मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमधील या घरासाठी सुशांत महिन्याला 4.5 लाख रुपये देत होता. मात्र घरमालकाने आता फ्लॅटचे भाडे पाच लाख रुपये केले आहे. हा फ्लॅट 3600 स्क्वेअर फूट परिसरात बांधला आहे. यात 4 बेडरूम आहेत, ज्यासोबत टेरेस देखील जोडलेली आहे. सुशांत डिसेंबर 2019 मध्ये या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि काही मित्रही त्याच्यासोबत राहत होते.

सुशांतने 14 जून 2020 रोजी त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांत त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. पण त्याची हत्या झाली, असे दावेही केले जात होते. त्याच्या निधनाचे दु:ख आजही लोकांच्या मनात ताजे आहे. अडीच वर्षांनंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT