महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – शेट्टींचा सरकारला घरचा आहेर

मुंबई तक

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सरकारमधील नेत्यांच्या नाराजीचा वारंवार सामना करावा लागत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र आले असले तरीही खालच्या पातळीवर अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांचं मनोमिलन झालेलं नाही, ज्यामुळे अनेकदा तिन्ही पक्षांमध्ये खटके उडताना पहायला मिळालं आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधला प्रमुख घटक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सरकारमधील नेत्यांच्या नाराजीचा वारंवार सामना करावा लागत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र आले असले तरीही खालच्या पातळीवर अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांचं मनोमिलन झालेलं नाही, ज्यामुळे अनेकदा तिन्ही पक्षांमध्ये खटके उडताना पहायला मिळालं आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधला प्रमुख घटक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आता सरकारला घरचा आहेर दिला आहे.

उस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचे दोन तुकडे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून साखर कारखानदार आणि दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आल्याची टीका केली आहे.

जाणून घ्या काय आहे वाद?

उस उत्पादक शेतकऱ्यांकडून एकरकमी एफआरपीची मागणी होत असताना महाविकास आघाडी सरकारने या एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टींनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. उसदर नियंत्रण समितीच्या सूत्रात बदल करायचा असेल तर तो संसदेला करावा लागेत, तो अधिकार कोणत्याही राज्याला दिलेला नसल्याचं शेट्टींनी सांगितलं. राज्य सरकार एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचं परिपत्रक काढूच शकत नसून हे बेकायदेशीर असल्याचंही शेट्टी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp