इंडोनेशियामधील ‘ती’ कंपनी अखेर महाराष्ट्रात; 7 हजार रोजगार निर्मीतीचा CM शिंदेंचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंमध्ये ज्या कंपनीवरुन जोरदार वाकयुद्ध रंगलं, दावे-प्रतिदावे झाले ती इंडोनेशियामधील सिनार्मस कंपनी महाराष्ट्रात दाखल झाली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीवस यांच्या उपस्थितीत मे. सिनार्मस पल्प अँड पेपर प्रा. लि. यांना जागा वाटप देकारपत्र प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.

शिंदे म्हणाले, इंडोनेशियामधील सिनार्मस कंपनी राज्यात पहिल्या टप्प्यात १० हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिनार्मस पल्प अँड पेपर कंपनीला रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे पहिल्या टप्प्यासाठी २८७ हेक्टर जमिनीचे वाटपपत्र प्रदान करण्यात आले. या उद्योगातून ७ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे सीईओ विपीन शर्मा, मे. सिनार्मस पल्प अँड पेपर कंपनीचे संचालक सुरेश किल्लम, कंपनीचे भारतातील प्रमुख सिद्धार्थ फोगट आदी मान्यवर उपस्थित होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं होतं वाकयुद्ध :

वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटासारखे प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याचे आरोप होतं असतानाच सिनार्मस पल्प अँड पेपर प्रा. लि. या कंपनी प्रकल्पावरुन देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं होतं. सोशल मिडीयावरुन रायगडमधील २० हजार कोटींची गुंतवणूक असलेला सिनार्मस पल्प अँड पेपर प्रकल्प युती सरकारच्या काळात आल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला होता.

भाजपच्या दाव्याला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प महाविकास सरकारच्या काळात आल्याचा दावा केला. ठाकरे म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस आणि खोके सरकार सांगत आहेत की हा प्रकल्प त्यांनी आणला. पण २३ मे २०२२ रोजीच एमआयडीसीचं ट्विट सांगत आहे की, दावोसमध्ये या प्रकल्पाचा करार झाला. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात झालेला आहे. यासाठी त्यांनी एमआयडीसीचे ट्विटही सादर केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT