T20 WC, Ind Vs Pak: …अन् BCCI चे सचिव जय शाह उठून नाचायला लागले, Video व्हायरल
दुबई: टी-20 विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानकडून टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारत-पाकिस्तान हा सामना प्रत्येक देशावासियांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. त्यामुळे या सामन्यात भारत नेमकी कशी कामगिरी करतो याकडेच सगळ्यांचं लक्ष असतं. या हायव्होल्टज सामन्यात एका क्षणी उत्सुकता एवढी शिगेला पोहचली होती की, खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह हे स्वत: उठून चक्क नाचत असल्याचं पाहायला मिळालं. […]
ADVERTISEMENT

दुबई: टी-20 विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानकडून टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारत-पाकिस्तान हा सामना प्रत्येक देशावासियांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. त्यामुळे या सामन्यात भारत नेमकी कशी कामगिरी करतो याकडेच सगळ्यांचं लक्ष असतं.
या हायव्होल्टज सामन्यात एका क्षणी उत्सुकता एवढी शिगेला पोहचली होती की, खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह हे स्वत: उठून चक्क नाचत असल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. पण काही जण त्यांना ट्रोलही करत आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची परिस्थिती फारच बिकट होती. त्यामुळे प्रत्येक रन हा मोलाचा होता. याच वेळी एका क्षणी शाहीन आफ्रिदीने केलेल्या ‘ओव्हर थ्रो’मुळे भारताला चार धावा अधिक मिळाला. हा क्षण खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे जय शाह यांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाही आणि त्यांनी थेट स्टँडमध्ये उभं राहूनच नाचण्यास सुरुवात केली.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाला अपेक्षित अशा धावा होत नव्हत्या. त्याचवेळी शाहीन आफ्रिदीच्या 19व्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला एक ओव्हर थ्रो मिळाला. हार्दिक पांड्याला आऊट करण्याच्या नादात शाहीनने केलेला थ्रो थेट सीमारेषेच्या पार गेला आणि त्यामुळेच भारतला एका बॉलमध्ये 5 रन्स मिळाले.










