Tanaji Sawant: ”भावना दुखावल्या असतील तर ‘बाळापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत’ सर्वांची माफी मागतो”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आरोग्यमंत्री तानाजी सावंत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मागे हाफकिनच्या वक्तव्यावरुन सावंत यांना ट्रोल करण्यात आले होते. आता मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर आणि अनेक संघटनांनी इशा दिल्यानंतर अखेर तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागतो असे सावंत म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

तानाजी सावंत माफी मागताना काय म्हणाले?

”आमच्या ग्रामीण भागातील चर्चेबाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. बोलण्याच्या ओघात बोलून जातो. त्याचा अर्थ कुठे तरी मराठी समजाच्या भावना दुखवाव्यात. त्यावर कुठे तरी राजकीय ताशेरे मारावेत, या पठडीतला मी मुळीच नाही. हे तुम्ही आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे माझ्या बोलण्यामुळे किंवा वक्तव्यामुळे माझ्या समाजाच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील. तर अगदी पाळण्यातील मुलापासून ते माझ्या आजोबा, पणजोबापर्यंत सर्वांची मी जाहीर माफी मागतो. मी एक या समाजाचा कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजातील मुला मुलींना त्यांच्या करिअर करीता आरक्षणाची गरज आहे. आमचा समाज मागासलेला आहे,” असे तानाजी सावंत म्हणाले आहेत.

पुढे तानाजी सावंत म्हणाले ”माझं जवळपास एक तासाचं भाषण आहे. मी तासभर बोल्लो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही, तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. पण पहिलं मी माझ्या मराठा समाजा सोबत राहणार आहे, हे विधान प्रसार माध्यमांनी कुठे दाखवले नाही. तसेच माझ्या बोलण्यामुळे मराठा समाजातील बांधव, माता, भगिनींच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची जाहीर माफी मागत आहे. तसेच मी माफी मागवून स्वस्थ बसणार नाही. माझ्या मराठा समाजातील मुला मुलींना आरक्षण मिळावं, यासाठी अविरतपणे कष्ट करीत राहणार आहे”, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

तानाजी सावंत यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं?

”2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यात आरक्षण गेलं. आम्हा मराठ्यांना काही कळत नाही का? तेव्हा काही आंदोलन वगैरे झालं नाही. सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, अशा शब्दात तानाजी सावंतांनी वादग्रस्त विधान केलं. पुढं बोलताना ते म्हणाले, बघा डोकं कसं चालवलं जातं आज ओबीसींमधून आरक्षणाची मागणी केली, पुढच्या दोन महिन्याने एससी प्रवर्गातून मागणी करतील. याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं सावंत म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT