अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाला अटक, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल
अरियालूर (तामिळनाडू): तामिळनाडूतील अरियालूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे सरकारी शाळेतील शिक्षकाला मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक गणित शिकवत असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, आरोपी शिक्षक त्यांच्याशी अयोग्यपणे बोलतो आणि घाणेरडा स्पर्श करतो. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आता या प्रकरणाचा सखोल […]
ADVERTISEMENT
अरियालूर (तामिळनाडू): तामिळनाडूतील अरियालूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे सरकारी शाळेतील शिक्षकाला मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक गणित शिकवत असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, आरोपी शिक्षक त्यांच्याशी अयोग्यपणे बोलतो आणि घाणेरडा स्पर्श करतो. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
याप्रकरणी मुलींच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. यानंतर बाल संरक्षण अधिकारी सेल्वाराज यांनी या प्रकरणाची चौकशी केली. ज्यामध्ये शिक्षक दोषी आढळून आला. यानंतर या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी कारवाई केली.
पॉस्को कायद्यांतर्गत शिक्षकाला अटक
हे वाचलं का?
पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पण या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक बरेच घाबरले आहेत. सध्या अनेक मुलांचे समुपदेशन केले जात आहे. आरोपी शिक्षक अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींसोबत असे घाणेरडे कृत्य करत असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शिक्षकाला अटक केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. यावर काम सुरू आहे. यापूर्वी शिक्षकाने असे कृत्य केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षाही देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अमरावतीत दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हीडिओ बनवून केले व्हायरल, तिघांना अटक
ADVERTISEMENT
यामुळे या आरोपी शिक्षकाला देखील अशाच पद्धतीने कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता अनेक पालकांनी केली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन या आरोपी शिक्षकावर कशा प्रकारे कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT