वाशीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, हार्बर लाईनवर लोकल सेवा विस्कळीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी मुंबईतल्या वाशी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका साहजिकच कामावर जाणाऱ्या नवी मुंबईकरांना बसला आहे. अनेक प्रवाशांना लोकल सेवा का विस्कळीत झाली आहे हे देखील समजलं नव्हतं. पनवेल मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठणाऱ्यांसाठी पिक अवर जिकिरीचे ठरत आहेत.

ADVERTISEMENT

पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशा दोन्ही म्हणजेच अप आणि डाऊन मार्गांवरची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. तूर्तास मानखूर्द ते छ.शि.म.ट ते मानखूर्द आणि पनवेल ते वाशी अशी लोकलसेवा मर्यादित स्वरूपात सुरू ठेवण्यात येत असल्याच्या सूचना नवी मुंबईतल्या स्थानकांवर दिल्या जात आहेत. फक्त हार्बरच नाही तर ठाणे वाशी या ट्रान्सहार्बर मार्गावरची सेवाही सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे ठप्प झाली आहे. ज्यांना वाशी, पनवेल किंवा पनवेलहून सीएसएमटी गाठायचं आहे त्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

हे वाचलं का?

सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळे मानखुर्द ते पनवेल या दरम्यान लोकल सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरचं लोकल सेवेचं वेळापत्रक पूर्णतः कोलमडलं आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ठाणे ते वाशी या मार्गावरची लोकल सेवाही ठप्प झाली.

ADVERTISEMENT

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी काय म्हटलं आहे?

ADVERTISEMENT

शिवाजी सुतार यांनी पहाटे पाच वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचं ट्विट केलं आहे. वाशी स्टेशनजवळ आम्ही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर डाऊन ट्रेन या मानखुर्द पर्यंत येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर ठाणे आणि वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवाही विस्कळीत झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हार्बर मार्गावरची ठप्प झालेली सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT