Terror Module : महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई; ‘मुंब्रा’तून आणखी एकजण अटकेत
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने घातपाती हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश केल्यानंतर देशभरात यांच्याशी संबंधितांची धरपकड केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसनंही संशयितांवर कारवाई सुरू केली आहे. एटीएसने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसच्या पथकाने मुंब्रातून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला एटीएस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी […]
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने घातपाती हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश केल्यानंतर देशभरात यांच्याशी संबंधितांची धरपकड केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसनंही संशयितांवर कारवाई सुरू केली आहे. एटीएसने आणखी एका आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसच्या पथकाने मुंब्रातून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला एटीएस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबईतील एका संशयित दहशतवाद्याला राजस्थानातील कोटा येथून अटक केल्यानंतर आता ही तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर देशाच्या विविध भागातून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. या माहितीनंतर सर्व राज्यांच्या एटीएस यंत्रणा सतर्क झाल्या. महत्त्वाचं म्हणजे दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांमध्ये एक मुंबईचा रहिवाशी आहे.
हे वाचलं का?
Terror Moduel : ATS ‘अॅक्शन मोड’मध्ये! मुंबईतून आणखी एकाला घेतलं ताब्यात
धारावीतील जान मोहम्मद शेखला अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने दिल्ली पोलिसांसोबत माहितीची देवाण-घेवाण केली. त्यानंतर एटीएसने कारवाई सुरू केली असून, संशयित जान मोहम्मद शेखनंतर आणखी दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Anti-Terrorism Squad has arrested a suspect from the Mumbra area, to be presented before ATS court today
— ANI (@ANI) September 19, 2021
कोण आहे संशयित दहशतवादी जान मोहम्मद?
ADVERTISEMENT
एटीएस प्रमुखांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ‘जन मोहम्मदची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पूर्वी तो मुंबईत टॅक्सी चालवायचा. नंतर त्याची नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर त्याने कर्ज काढून स्वतःची टॅक्सी घेतली होती. मात्र, कर्जाची परतफेड करू शकला नाही. हफ्ते न भरल्याने बँकेनं त्याची गाडी ओढून नेली. त्यानंतर त्याने मोटारसायकलही घेतली होती. तो झोपडपट्टीत राहायचा. एकूणच त्याची परिस्थिती हलाखीची होती. त्यातच डी-गँगने त्याच्याशी संपर्क केला असू शकतो’, असं एटीएसप्रमुख विनीत अग्रवाल म्हणाले होते.
कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?
महाराष्ट्र एटीएसने शुक्रवारी पहाटे नागपाडा परिसरातून एका संशयिताला अटक केली होती. तो डी-गँगच्या संपर्कात असल्याची माहिती असून, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं. जाकिर असं संशयित आरोपीचं नाव आहे. जाकिरनंतर एटीएसने मुंब्रा परिसरातून एका अटक केल्यानं घातपाती कटाचं जाळं किती मोठ आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT