Vidhan Sabha: ‘आदित्य ठाकरेंची DNA टेस्ट करा, बाळासाहेबांचे नातू आहेत का ते तपासा’, Nitesh Rane यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबई: ‘मी बाळासाहेबांचा नातू आहे हे मी पण सांगू शकत नाही अशी अवस्था आहे. म्हणून अध्यक्ष महोदय खरंच त्यांचा डीएन तपासण्याची वेळ आलेली आहे. की, हे खरंच आहे की, कुठे कचऱ्यातून उचलेले आहेत. हे तपासण्याची वेळ आलेली आहे.’ असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘मी बाळासाहेबांचा नातू आहे हे मी पण सांगू शकत नाही अशी अवस्था आहे. म्हणून अध्यक्ष महोदय खरंच त्यांचा डीएन तपासण्याची वेळ आलेली आहे. की, हे खरंच आहे की, कुठे कचऱ्यातून उचलेले आहेत. हे तपासण्याची वेळ आलेली आहे.’ असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली आहे.
विधानसभेत काल (5 जुलै) भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे आज (6 जुलै) भाजपच्या वतीने थेट विधानसभेच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा घेण्यात आली.
विधानसभेत विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही असं म्हणत भाजपने सभागृहाबाहेर प्रति विधानसभेचं आयोजन केलं होतं. ज्यावर सत्ताधारी आमदारांनी विरोध केल्यानंतर मार्शलच्या माध्यमातून भाजपच्या आमदारांना हटविण्यात आलं.
यानंतर भाजप आमदार पत्रकार कक्षात अभिरुप विधानसभा स्थापन करुन सरकारवर टीका सुरु केली. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे हे फारच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.