‘बाम लाव्याने ठाण्याच्या वेड्याच्या…’, भास्कर जाधवांची कदमांवर टीका
Bhaskar jadhav vs Ramdas Kadam : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड जिल्ह्यात जाहीर सभा आहे. या सभेला सुरुवात देखील झाली आहे.या सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचा बाम लाव्या असा उल्लेख करत त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याची सडकून टीका केली आहे.(thackarey group mla bhaskar jadhav criticize mla ramdas […]
ADVERTISEMENT
Bhaskar jadhav vs Ramdas Kadam : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड जिल्ह्यात जाहीर सभा आहे. या सभेला सुरुवात देखील झाली आहे.या सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचा बाम लाव्या असा उल्लेख करत त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याची सडकून टीका केली आहे.(thackarey group mla bhaskar jadhav criticize mla ramdas kadam in khed udhhav thackarey)
ADVERTISEMENT
ठाकरेंच्या टिकेपूर्वीच कदमांनी केली प्रत्युत्तराची तयारी; सभेची तारीख जाहीर
या ठिकाणचे आमदार सोडून गेले, सोडून गेल्यानंतर त्यांच्या वडिलांची नाटक आम्ही सांगितली असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. तसेच व्यासपीठावरून त्यांनी रामदास कदम यांचा बाम लाव्या असा उल्लेख केला. जाधव म्हणाले, बाम लाव्या माहिती आहे का नाही ? हा बाम लाव्या काय वेडा झालाय काय? सकाळ संध्याकाळ काहीही बरळ असतो अशी टीका त्यांनी केली. यासोबत ‘या बाम लाव्याच्या डोक्यावर परिणाम झालाय’ ‘म्हणूनच त्याने ठाणेकराचा हात धरलाय, कारण वेड्याचे हॉस्पिटल तिथेच असे म्हणत जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रहार केला.
हे वाचलं का?
भास्कर जाधव यांनी पुढे शिवसैनिकांना आवाहन करताना म्हटले की,याला जर मातीत घालायच असेल तर संजय कदमला आपल्याकडे आणावाच लागेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दुधाच्या पेल्यात संजय कदम यांना साखर म्हणून टाकावे लागेल असे देखील ते म्हणाले आहेत. तसेच रामदास हा फडतूस माणूस, भंपक माणूस आहेस, तुझी बोलती शिमग्याच्या दिवशी बंद करणा असे जाधव म्हणाले आहेत.
हा राम्या सांगतोय, त्या पिक्चरच नाव होत झपाटलेला आहे, त्यातला हा तात्या विंचू असल्याची टीका जाधव यांनी कदम यांच्यावर केली. प्रत्येकाच्या घरात जाऊन बोलतोय, ‘मला उद्धव साहेबांनी संपवलं’, ‘अरे तुला मोठंच का केलं? हा म्हणतोय माझं पर्यावरण खात आदित्य ठाकरे बाजूला बसून घेऊन गेले, अरे तुला पर्यावरण तरी बोलता येत का? पय्यावरण खात बोलतोस, अशी मिश्किल टीका देखील त्यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT