Shivsena तुमच्या बापाची आहे का भो*%#? संजय राऊतांचा तोल ढळला!
सांगली : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात गेल्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने निवडणूक आयोग आणि शिंदे यांना लक्ष्य केलं जातं आहे. अशातच आज (शुक्रवारी) सांगलीत बोलताना ठाकरे गटाचे (Thackeray Faction) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) असभ्य भाषेत टीका केली. तसंच हे आपण […]
ADVERTISEMENT

सांगली : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात गेल्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने निवडणूक आयोग आणि शिंदे यांना लक्ष्य केलं जातं आहे. अशातच आज (शुक्रवारी) सांगलीत बोलताना ठाकरे गटाचे (Thackeray Faction) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) असभ्य भाषेत टीका केली. तसंच हे आपण जाणीवपूर्वक बोलतं असल्याचंही सांगितलं. (Thackeray faction leader Sanjay Raut got angry while criticizing the Election Commission)
काय म्हणाले संजय राऊत?
मी जे बोलत आहे ते जाणीवपूर्वक बोलत आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या घशात आणि खिशात शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण ही निशाणी घातली आहे, तसे करायला शिवसेना तुमच्या बापाची आहे का रे भो*%#? असा सवाल करत राऊतांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सांगलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…” : CM शिंदेंचा टोमणा
पन्नास खोके एकदम ओके ही स्लोगन जगप्रसिद्ध झाली , बघता बघता व्हायरल झाली. सांगली मिरजेचे आमदार फक्त शिवसेनेच्या जीवावर निवडून येतात, आता यावेळी कसे निवडून येतात ते बघू? असं आव्हानही यावेळी राऊत यांनी भाजपाला दिलं. संजय राऊत पुढे म्हणाले की , महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याबद्दल अशी वक्तव्य करणे योग्य वाटत नाही असं मी व्यासपीठावरून बोलतो. पण जनतेच्याच ह्या भावना असतील तर मग माझा नाईलाज आहे. तसंच दिल्लीतील रंगा बिल्ला, यांच्या आदेशानुसारच हे सर्व घडत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी बोलताना केला.