Islamic Hackers: ठाणे पोलिसांसह भारतातल्या सरकारी वेबसाईट्स हॅक

मुंबई तक

भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर इन्स्टिट्युट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. Thane Police : मुंब्रा पोलीस ठाण्यातील १० पोलीस अधिकारी-कर्मचारी खंडणी प्रकरणी निलंबित मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशातल्या अनेक वेबसाईट्स […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूर इन्स्टिट्युट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Thane Police : मुंब्रा पोलीस ठाण्यातील १० पोलीस अधिकारी-कर्मचारी खंडणी प्रकरणी निलंबित

मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशातल्या अनेक वेबसाईट्स हॅक केल्या गेल्या आहेत. या ग्रुपने जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं होतं. नुपूर शर्मांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं. मुस्लिम धर्मीयांची माफी मागा हाच संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यावर दिला आहे.

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आखाती देशांमध्येही उमटले होते. त्यानंतर नुपूर शर्मा यांनी माफीही मागतिली. तसंच भाजपने त्यांना निलंबितही केलं. मात्र या प्रकरणाचे पडसाद थांबताना दिसत नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp