Rabri Devi: माजी सीएमच्या घरी सीबीआय पथक; ‘या’ घोटाळ्याप्रकरणी चौकशी
CBI News : पाटना : बिहारच्या (Bihar) माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri devi) यांच्या निवासस्थानी आज (सोमवारी) सीबीआयने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने राबडी देवींची ४ तास कसून चौकशी केली. आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी म्हणजेच जमिनीच्या मोबदल्यात रेल्वेत नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआयने त्यांची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. राबडी देवी यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे १२ सदस्यीय पथक आले […]
ADVERTISEMENT

CBI News : पाटना : बिहारच्या (Bihar) माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri devi) यांच्या निवासस्थानी आज (सोमवारी) सीबीआयने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने राबडी देवींची ४ तास कसून चौकशी केली. आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी म्हणजेच जमिनीच्या मोबदल्यात रेल्वेत नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआयने त्यांची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. राबडी देवी यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे १२ सदस्यीय पथक आले होते. (The CBI team reached the residence of former Bihar Chief Minister Rabri Devi on Monday)
दरम्यान, या चौकशीवेळी राबडी देवी यांची मुले आमदार तेज प्रताप आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते. सीबीआयने राबडी देवी यांना काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी नोटीस दिली होती. तेव्हा ही चौकशी सीबीआय कार्यालयात होणार होती. मात्र नंतर त्यांना दिलासा देत सीबीआयने त्यांची त्यांच्या घरीच चौकशी करण्याचा निर्णय घेतला. राबडी देवी यांचे वकीलही त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
कार्यकर्त्यांची निवासस्थानाबाहेर निदर्शने :
दुसरीकडे सीबीआयच्या कारवाईला विरोध करत आरजेडीचे कार्यकर्ते राबडी देवींच्या घराबाहेर जमा झाले होते.कामगार शर्ट काढून आंदोलन करत होते. यावेळी कामगारांनी सीबीआय आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. मात्र, राबडी देवी यांच्या निवासस्थानीही सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा केली असून सीबीआयबाबत बोलणी झाली असल्याची माहिती आहे.
Ramdas Kadam: “नारायण राणे गेले तेव्हा तुमची #@ पिवळी झाली”, ठाकरेंवर वार