Sanjay Raut: ”राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीत”
प्रविण ठाकरे मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल दिल्लीला गेले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. राज्य मंत्रीमंडळ विस्तारावर तिथे चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही […]
ADVERTISEMENT
प्रविण ठाकरे
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल दिल्लीला गेले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. राज्य मंत्रीमंडळ विस्तारावर तिथे चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेणार आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘’मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत कारण ते भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे, शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईत आहे. ते मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी दिल्लीत गेले आहेत, सर्वांचे मुखवटे आता गळून पडले असल्याचे संजय राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
Sanjay Raut: एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भाजपमध्ये मनानं, तनानं आणि धनानं विलीन झाले
बेळगाव सीमाप्रश्नावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) वेधले लक्ष
ADVERTISEMENT
बेळगाव सीमाभाग वादावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की ’’मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहेत, बेळगाव प्रश्न आहे तोपर्यंत तो भाग केंद्रशासित व्हावा अशी मागणी मोदींकडे करत तसा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊन यावा, बेळगावचे शिष्टमंडळ भेटले, त्यांनी सांगितले की तेथे मराठी लोकांना त्रास होत आहे’’.
ADVERTISEMENT
येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. शिवसेना अनेक खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले ‘’ राष्ट्रपती पदाचे उमेदवार आदिवासी आहेत त्यामुळे अनेक आदिवासी खासदारांना वाटते की त्यांना पाठिंबा द्यावा’’.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT