ठाकरे सरकारमधले ‘डर्टी डझन’ कोण? भाजप नेते किरीट सोमय्यांनी यादीच केली जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. त्यात आज किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधले डर्टी डझन कोण? याची एक यादीच जाहीर केली आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. अनिल देशमुख- नवाब मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर? पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचं हे त्यांनीच ठरवावं, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी मुंबईत केलं आहे.

‘भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? माझ्या बायकोला जाऊन विचार’, किरीट सोमय्या प्रचंड संतापले

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आज झालेल्या आंदोलनावरही किरीट सोमय्यांनी टीका केली. महाविकास आघाडीचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परबही आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झाली आहे.

किरीट सोमय्यांनी जाहीर केलेले डर्टी डझन कोण?

ADVERTISEMENT

1. अनिल परब

ADVERTISEMENT

2. संजय राऊत

3. सुजित पाटकर

4. भावना गवळी

5. आनंद आडसुळ

6. अजित पवार

७. हसन मुश्रीफ

8. प्रताप सरनाईक

9. रविंद्र वायकर

10. जितेंद्र आव्हाड

11. अनिल देशमुख

12. नवाब मलिक

या यादीत शिवसेनेच्या अनिल परब, संजय राऊत, भावना गवळी, आनंद अडसुळ, प्रताप सरनाईक यांची नावं आहेत. तर अजित पवारांचं नाव हे सहाव्या क्रमाकांवर आहेत. संजय राऊत यांच्यावर आरोप करत असताना सुजीत पाटकर यांचं नावही त्यांनी घेतलं होतं. या नावाचाही समावेश यामध्ये आहे. नवाब मलिक यांचं नाव बाराव्या क्रमांकावर आहे.

मी काही संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन दोन ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचं नाव संजय राऊत सांगू शकले नाहीत. कुठे आहे वाधवान? अशी फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरे यांची माणसं करतात, आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता 12 नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. त्यांना ठरवू द्या कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचं, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT