बापानं न्यायासाठी ४२ दिवस लेकीचा मृतदेह ठेवला मिठात; अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेची सत्यता काय?
रोहिणी ठाकूर, प्रतिनिधी, नंदूरबार नंदुबार: मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरुण ठेवला आहे. मुलीवर बलात्कार होवूनही तिचा खून झाला असतांना पोलीसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला, इतकच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही […]
ADVERTISEMENT

रोहिणी ठाकूर, प्रतिनिधी, नंदूरबार
नंदुबार: मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरुण ठेवला आहे. मुलीवर बलात्कार होवूनही तिचा खून झाला असतांना पोलीसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला, इतकच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणीच करण्यात आली नाही. त्यामुळेच याबापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थे विरोधातच लढा सुरु केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात घडलेली घटना नेमकी काय?
नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील रहिवासी आंतरसिंग काल्या वळवी यांची विवाहीत मुलगी वावी येथील रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एकजण बळजबरीने गाडीवर बसवून गावाबाहेर घेऊन गेले. यानंतर तिचा तिच्या नातलगाला आलेल्या फोनमध्ये तिच्या सोबत रणजीतसह चार जणांनी चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत असल्याचे तिने सांगत ते मला मारुन टाकतील असे सांगितले. काही काळातच तिने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला.
तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलीसांना सांगून देखील रंजीलाच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तिला फाशी दिली गेली असून पोलीसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुबीयांनी केला आहे.