शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच, जामीन अर्जावर पुढची सुनावणी २ नोव्हेंबरला

मुंबई तक

Shivsena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याबाबत ईडीने अटक केली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी होते आहे. मात्र आता जामीन अर्जावरचा निकाल दिवाळी सुट्टीनंतर येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार हे जवळपास नक्की आहे. न्यायालायाचं कामकाज दिवाळीच्या सुट्टीत होणार नाही न्यायालयाचं कामकाज दिवाळीच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shivsena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याबाबत ईडीने अटक केली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी होते आहे. मात्र आता जामीन अर्जावरचा निकाल दिवाळी सुट्टीनंतर येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार हे जवळपास नक्की आहे.

न्यायालायाचं कामकाज दिवाळीच्या सुट्टीत होणार नाही

न्यायालयाचं कामकाज दिवाळीच्या सुट्टी होणार नाही. न्यायालयाला दिवाळीची सुट्टी सुरू होते आहे त्यासाठी फक्त तीन दिवस राहिले आहेत. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर तीन दिवसात निकाल देणं शक्य होणार नाही. असे संकेत न्या. एम.जी. देशपांडे यांनी मंगळवारच्या सुनावणीनंतर दिले. त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार हे नक्की आहे.

संजय राऊत यांच्यातर्फे अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला

संजय राऊत यांच्यातर्फे अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केल्यानंतर ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी उत्तरादाखल युक्तिवाद मांडला. त्यानंतर मंगळवारी मुंदरगी यांनी सिंग यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत प्रत्युत्तरादाखल कायदेशीर युक्तीवाद मांडला. तेव्हा आम्ही केवळ आमच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांच्या आधारावर युक्तीवाद मांडला. परंतू मुंदरगी यांनी आणखी नवे मुद्दे उपस्थिते केले असल्याने त्याच्या उत्तरादाखल आम्हालाही युक्तिवाद करावा लागेल असं सिंग यांनी न्यायालयाला सांगितलं. सुनावणी लवकर संपवण्याबाबत न्यायालयाला कोणतीही घाई नाही. युक्तिवाद लवकर संपवावा असा दबावही हे न्यायालय दोन्ही पक्षकारांवर आणणार नाही.

दोन्ही बाजूंचा पूर्ण युक्तिवाद न्यायालय ऐकेल आणि त्यानंतरच निर्णय देणार आहे. कारण निकालाचे परिणाम काय असतील याची न्यायालयाला जाणीव असून सत्यापर्यंत पोहचणं हेच न्यायालयासाठी महत्त्वाचं आहे. मात्र आता दिवाळीचं सुट्टीचं दिवस सुरू होणार असल्याचं लक्षात घेता तीन दिवसात निकाल देणं शक्य होणार नाही असंही न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp